गोवा विधानसभेचे 18 दिवशीय पावसाळी अधिवेशन आज सोमवार दि. 15 जुलैपासून सुरू आहे असून ते 7 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. अधिवेशनात 640 तारांकित तर 1849 अतारांकित प्रश्न मांडण्यात आलेले आहेत. विधानसभेत सहा महिन्यांच्या खर्चालाही मान्यता देण्यात येणार आहे.
दरम्यान, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष व रेव्ह्युलेशनरी गोवन्स या विरोधी पक्षांनी विधानसभेत सत्ताधारी भाजप व मगोला घेरण्यासाठीची योजना तयार केली आहे. विधानसभेत म्हादई नदी, पणजी स्मार्ट सिटी, नुकतीच झालेली वीज दरवाढ, कोळसा व औद्योगिक प्रदूषण, रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, राज्यातील अनुसूचित जमातीसाठीचे राजकीय आरक्षण याविषयांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत. अधिवेशनात नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठरावही मांडण्यात येणार आहे.