>> आमदार व्हिएगश यांच्याकडून प्रशंसा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून विकासकामांच्या बाबतीत कुठलाही प्रकारचा पक्षीय भेदभाव केला जात नाही. गोव्याचे भाग्यविधाते, पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता विकासकामे हाती घेतली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून विकास कामाबाबत भेदभाव केला जात नाही. त्यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांसाठी चांगले सहकार्य मिळत आहे, अशा शब्दांत बाणावलीचे आपचे आमदार विंन्झी व्हिएगश यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या कार्याची प्रशंसा केली. कोलवा येथे एका कार्यक्रमात आमदार व्हिएगश बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री आलेक्स सिक्वेरा यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आदर्श गोवा निर्माण करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. आमच्यामध्ये राजकीय पातळीवर मतभेद असले तरी हे मतभेद विकासकामांच्या आड येत नाहीत. आपल्या मतदारसंघातील विकासकामांना भेदभाव न करता मान्यता देण्याचे काम करीत असल्याने मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळत आहे, असेही आमदार व्हिएगश यांनी सांगितले.