विंडीजची भारतावर मात; मालिकेत बरोबरी

0
122

लेंडल सिमन्सने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवित नोंदविलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे वेस्ट इंडीजने तिरुवनंतपुरमध्ये खेळविण्यात आलेल्या दुसर्‍या टी-२० लढतीत भारताचा २ गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सलग दुसर्‍या सामन्यातील गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका टीम इंडियाला बसला. विंडीजने ७ पराभानंतर भारताविरुद्ध हा पहिला विजय नोंदविला आहे.

भारताकडून मिळलेले १७१ धावांचे लक्ष्य विंडीजने १८.३ षट्‌कांत गाठले. विंडीजला हे लक्ष्य कठीण गेले असते. जर भारताने भुवनेश्वर कुमारने टाकेलेल्या पाचव्या षट्‌कांत दोन झेल सोडले नसते तर. या षट्‌कांत वॉशिंग्टन सुंदरने लेंडल सिमन्सला तर ऋषभ पंतने एव्हिन लुईसचा जीवदान दिले होते. त्याचा पुरेपुर फायदा उठवित या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेर वॉशिंग्टनने जमलेली ही जोडी फोडली. त्याने लुईसला (४०) यष्ट्यांमागे पंतकरवी यष्टिचित केले.

शिमरॉन हेटमायरने २३ धावा करून परतला. परंतु त्यानंतर सिमन्सने निकोलास पूरनच्या साथीत आणखी गडी बाद होऊ न देता संघाचा विजय साकारला. सिमन्स ४ चौकार व ४ षट्‌कारांसह ४५ चेंडूत ६७ धावांवर नाबाद राहिला. तर त्याला चांगली साथ देताना पूरनने ४ चौकार व २ षट्‌कारांच्या सहाय्याने १८ चेंडूत विस्फोटक ३८ धावा जोडल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विंडीजसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने२० षट्‌कांत ७ बाद १७० धावा केल्या होत्या.

भारताची सुरूवात खराब झाली. ३.१ षटकात संघाची धावसंख्या २४ असताना खॅरी पिएरेच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलला (११) झेलबाद झाला. त्यानंतर रोहित १५ धावा काढून परतला. तिसर्‍या स्थानी मिळालेल्या बढतीचा फायदा उठवित शिवम दुबेने आक्रमक खेळ करत अर्धशतक पूर्ण केल. दुबेने ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारासह ५४ धावाची खेळी केली. विराट कोहली आज मोठी खेळी क़रू शकला नाही व १९ धावा करून परतला. त्यानंतर ऋषभ पंतने २२ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ३३ धावा करत संघाची धावसंख्या २० षटकात १७० पर्यंत नेली. वेस्ट इंडिजकडून केस्रिक विल्यम्स आणि हेल्डन वॉल्शने प्रत्येकी २ तर शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर आणि खॅरी पिएरने प्रत्येकी १ गडी बाद केला.

धावफलक
भारत ः रोहित शर्मा त्रिफळाचित गो. जेसन होल्डर १५, लोकेश राहुल झे. शिमरॉन हेटमायर गो. खॅरी पिएरे ११, शिवम दुबे झे. शिमॉरन हेटमायर गो. हेडन वॉल्श ५४, विराट कोहली झे. लेंंडल सिमन्स गो. केस्रिक विल्यम्स १९, ऋषभ पंत नाबाद ३३, श्रेयस अय्यर झे. ब्रँडन किंग गो. हेडन वॉल्श १०, रविंद्र जडेजा त्रिफळाचित केस्रिक विल्यम्स ९, वॉशिंग्टन सुंदर झे. व गो. शेल्टन कॉरटेल ०, दीपक चहर नाबाद १. अवांतर ः १८ धावा. एकूण २० षट्‌कांत ७ बाद १७० धावा.

गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल ४/० /२७/१, खॅरी पिएरे २/०/११/१, जेसन होल्डर ४/०/४२/१, केस्रिक विल्यम्स ४/०/३०/२, कीरॉन पोलार्ड २/०/२९/०, हेडन वॉल्श ४/०/२८/२.
वेस्ट इंडीज ः लेंडल सिम्नस नाबाद ६७, एव्हिन लुईस यष्टिचित ऋषभ पंत गो. वॉशिंग्टन सुंदर ४०, शॅमरॉन हेटमेयर झे. विराट कोहली गो. रविंद्र जडेजा २३, निकोलस पूरन नाबाद ३८. अवांतर ः ५. एकूण १८.३ षट्‌कातं २ बाद १७३ धावा.
गोलंदाजी ः दीपक चहर ३.३/०/३५/०, भुवनेश्वर कुमार ४/०/३६/०, वॉशिंग्टन सुंदर ४/०/२६/१, युजवेंद्र चहल ३/०/३६/०, शिवम दुबे २/०/१८/०, रविंद्र जडेजा २/०/२२/१.