वाहतूक सुरक्षा सप्ताह चालू असतानाच काल पहाटे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या एका ४० ते ४५ वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह वास्को पालिसांना शहरातील खेतोबा पेट्रोल पंप परिसरात सापडला. काल सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना फोनवरून देण्यात आल्यावर वास्को पोलीस पथक घटनास्थळी जाऊन त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मध्यरात्री किंवा पहाटे अज्ञात वाहनाला धडकून त्याचा मृत्यू झाल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निखिल पालेकर अधिक तपास करीत आहेत.