वायर चोरीप्रकरणी सुरक्षारक्षकाला अटक

0
189

वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातून तांब्याची वायर चोरी प्रकरणी त्याच कंपनीतील सुरक्षारक्षकाला वेर्णा पोलिसांनी अटक केली आहे.
वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एम्मेसैरो एअरकॉन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अहिरे यांनी एका अज्ञात व्यक्तीने पंचवीस हजार रुपये किमतीच्या तांबे चोरी केल्याची फिर्याद वेर्णा पोलिसांमध्ये दाखल केली. मागील पंचेचाळीस दिवसापासून या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम पाहणारा अजय कुमार नंदा (३६ वर्षे, मूळ ओडिशा) या सुरक्षारक्षकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. आरोपी गेल्या सतरा वर्षांपासून गोव्यात भाड्याच्या खोलीत राहत आहे. वेर्णा पोलिसांनी चोरीचा माल जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे.