वाघेरी डोंगर पर्यावरणीयदृष्ट्य संवेदनशील घोषित करण्याचा विचार

0
37

सत्तरी तालुक्यातील वाघेरी डोंगर हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभाग घोषित करण्याबाबत वन खाते विचार करीत आहे. ह्या पार्श्‍वभूमीवर वनमंत्री विश्‍वजित राणे यांनी विशेष मुख्य वनपाल, मुख्य वनपाल, खात्याचे विभागीय वन अधिकारी व अन्य वन अधिकारी तसेच नगर आणि नियोजन खात्याचे अधिकारी यांची ह्या प्रश्‍नी चर्चा करण्यासाठी एक संयुक्त बैठक बोलावली आहे.

गुगलद्वारे घेतलेले तसेच उपग्रहाद्वारे उपलब्ध झालेल फोटो यावरून वाघेरी डोंगराच्या माथ्यावरील निसर्ग व वनराईवर नांगर फिरवण्यात आला असल्याचे स्पष्ट झालेले आहे. ज्या काही जमीन मालकांनी आपली वाघेरी डोंगराच्या माथ्यावरील जमीन परप्रांतियांना विकली आहे, त्यांचेच हे कृत्य आहे, मात्र, त्याबाबत कुणीही तक्रार नोंदवलेली नाही, असे राणे यांनी ट्विट केले आहे.