वर्ल्डकपमुळेच एमएस धोनी निवृत्त

0
368

टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यामुळेच टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे भारताचे लिटल् मास्टर सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.

धोनीने स्वातंत्र्यदिनी आपल्या चाहत्यांना अनपेक्षित धक्का देत निवृत्तीची घोषणा केली होती. धोनीच्या निवृत्तीविषयी बोलताना गावसकर म्हणाले की, यंदाच्या आयपीएलमधील स्वतःच्या कामगिरीचे मूल्यमापन त्याला करायचे होते. त्यानंतरच तो टी-ट्वेंटी विश्‍वचषकात खेळणार की नाही याचे आकलन करणार होता. आयपीएलला कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलली गेली. तसेच टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा देखील पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी जोडून राहणे योग्य वाटले नसावे. म्हणून त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असावा. जर विश्‍वचषक झाला असता तर धोनी नक्कीच खेळला असता.

यावर्षी टी-ट्वेंटी विश्‍वचषक ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार होता पण कोरोना विषाणूंच्या साथीमुळे आता ही विश्‍वचषक स्पर्धा २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच आयसीसीने जाहीर केल्याप्रमाणेच २०२१ मध्ये आधीच ठरल्याप्रमाणे भारतात टी-ट्वेंटी विश्‍वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. तर २०२२ चा टी-ट्वेंटीचा विश्‍वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होईल.

धोनीने घडवले खेळाडू
धोनीच्या छायेतच विराट कोहली घडला. धोनीने फिरकीपटूंमध्ये चैतन्य जागवायचे काम केले. त्यांंच्यात विश्‍वास निर्माण केला. कपिलदेव यांच्याप्रमाणेच धोनीचे खेळाप्रती असलेले प्रेम अनन्य साधारण