लोकायुक्तपदी सरकारतर्फे अंबादास जोशी यांचे नाव

0
153

राज्य सरकारने लोकायुक्त पदासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांचे नाव निश्‍चित केले आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेश सोमवारी जारी होण्याची शक्यता आहे.
राज्यात नवीन लोकायुक्त नियुक्त करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने लोकायुक्तपदासाठी निवृत्त न्यायाधीश यू. व्ही. बाक्रे यांचे नाव निश्‍चित केले होते. तथापि, त्यांनी वैयक्तिक कारणास्तव लोकायुक्त पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे लोकायुक्त पदासाठी नवीन व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू केली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.
लोकायुक्त पी. के. मिश्रा यांचा कार्यकाळ १७ सप्टेंबर २०२० रोजी पूर्ण झाल्यानंतर लोकायुक्तपद रिक्त आहे.