लॉकडाऊनमुळे ऊस शेतकर्‍यांचे ८५ लाख रुपयांचे नुकसान

0
111

कोविड-१९ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झालेले असून ऊस तोडणी कामगार मिळू न शकल्यामुळे राज्यातील तब्बल २६०० टन एवढा कापणीशिवाय शिल्लक राहिलेला ऊस सुकून गेल्याने ऊसाचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांचे ८५ लाख रु.चे नुकसान झाले असल्याची माहिती काल ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या सूत्रानी दिली.
राज्यातील ऊस तोडणीचे काम करण्यासाठी शेतकर्‍यांना परराज्यातून ऊस तोडणी मजूर आणावे लागतात. प्रामुख्याने हे मजूर महाराष्ट्र राज्यातून आणले जातात. मात्र, यंदा कोविड-१९ महामारीमुळे २३ मार्चपासून राज्यातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या. या सीमा अद्याप खुल्या करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे २६०० टन एवढा ऊस शेतकर्‍यांना तोडता आलेला नाही. हा ऊस सुकून गेलेला असून त्यामुळे शेतकर्‍यांचे ८५ लाख रु.चे नुकसान झालेले आहे. या नुकसानाची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी कृषी खात्याकडे यापूर्वीच केलेली आहे.