लष्करी ठिकाणांवर द्रोनविरोधी यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय

0
101

भारताने आता प्रमुख लष्करी ठिकाणांवर द्रोनविरोधी यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. द्रोनद्वारे असलेला हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन याबाबत एक योजना राबवण्यात येणार आहे. जम्मूतील हवाई दलाच्या तळावर द्रोन हल्ला झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत तीनवेळा द्रोन दिसून आले आहेत. हे द्रोन सीमेपलिकडून नियंत्रण केले जात असल्याची माहिती मिळाली असून यामुळे सीमा भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षित करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.