लष्करप्रमुख बिपीन रावत होणार ३१ रोजी सेवानिवृत्त

0
94

लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होणार आहेत. आता या पदावर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची वर्णी लागणार आहे. एक मराठी माणूस लष्करप्रमुख या पदावर बसणार आहे. ले. ज. नरवणे यांनी लष्कराच्या उपप्रमुखपदाच्या कार्यभार १ सप्टेंबर २०१९ रोजी स्वीकारला होता. आता बिपीन रावत यांच्यानंतर भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत.

मनोज नरवणे हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय आणि सुरुवातीचे लष्करी शिक्षण हे पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासतानाच त्यांना लष्करात सेवा करावी असे वाटू लागले. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करुन ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करावा यासाठी कार्यरत असणार्‍या राष्ट्रीय रायफल्सचे नेतृत्त्व त्यांनी केले आहे. तसेच लष्करातील अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे.