लतिफचे पीसीबीवर ताशेरे

0
144

पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज राशिद लतिफ याने काल बुधवारी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अव्यावसायिक आणि बेजबाबदार कारभारावर ताशेरे ओढले. पाकिस्तान संघातील जे खेळाडू सरावासाठी मैदानात आले होते, ते सारे एकत्रच सराव करत होते. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो हे समजले पाहिजे होते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा बेजबाबदार कारभार आणि खेळाडूंनी न राखलेले सोशल डिस्टन्सिंग यामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघात कोरोनाचा फैलाव वेगाने झाल्याचे लतिफ म्हणाला. पीसीबीने खेळाडूंनी कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या. सराव करताना सुरक्षित अंतर राखण्याचे भान खेळाडूंनादेखील नव्हते. आपल्याला कोरोना होणार नसल्याच्या भावनेनेच ते सर्व एकत्र सराव करत होते, असे लतिफ म्हणाला.

पाकिस्तान क्रिकेट मंडळ करत असलेल्या कोरोना चाचणीच्या दर्जाबद्दलही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगळवारी केलेल्या चाचणीत अष्टपैलू मोहम्मद हफीझचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. काल बुधवारी संपूर्ण कुटुंबियांसह केलेल्या चाचणीत मात्र हफीझ निगेटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे आता कोणता अहवाल खरा आणि कोणता खोटा, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.