रोहित मोन्सेर्रातच्या निवडीवरून चोडणकर यांची भाजपवर टीक

0
71

विरोधी बाकावर असताना कॉंग्रेसला घराणेशाहीवरून टोमणे मारणार्‍या भाजपने रोहित मोन्सेर्रात यांना पणजीचे महापौर बनवून गोव्याच्या राजकारणात घराणेशाहीचा नवा पायंडा घातल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

२०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस पक्षाची थट्टा करणारे भाजपवाले कॉंग्रेस पक्ष न्याहारीच्या वेळी मंत्रिमंडळ बैठक घेण्याची तयारी करीत असल्याचे टोमणे मारत होते. रोहित मोन्सेर्रात यांना आता महापौरपदी बसवून भाजपने सगळे विक्रम मोडल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. माता मंत्री, पिता आमदार व पुत्र महापौर अशी ही भाजपची घराणेशाही असल्याचे चोडणकर म्हणाले. पणजी महापालिकेवर निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये महापौर बनण्याच्या लायकीचा एकही उमेदवार नव्हता काय, असा प्रश्‍नही चोडणकर यांनी केला आहे.