राष्ट्रपतींवर नवी दिल्लीत यशस्वी शस्त्रक्रिया

0
77

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर दिल्लीतील एम्स इस्पितळात यशस्वीपणे बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली. राष्ट्रपती कोविंद यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना हृदयावर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार काल मंगळवारी राष्ट्रपती कोविंद यांच्यावर हृदयावर बायपास शस्त्रक्रिया केली गेली. बायपास शस्त्रक्रिया झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर डॉक्टरांचा एक गट त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.