राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा

0
30

गोवा विद्यापीठाचा 34 वा दीक्षांत सोहळा बुधवार दि. 23 ऑगस्ट रोजी संपन्न होणार असून, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून या सोहळ्याला हजर राहणार आहेत. हा सोहळा दोनापावला येथील राजभवनच्या दरबार सभागृहात संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता सुरू होणार असल्याचे गोवा विद्यापीठाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.