राशिभविष्य

0
152

मेष : विद्यार्थी, संतती यांना यशदायक काळ राहील. सरकारी कार्यालयीन कामकाजात प्रगतीपथावर रहाल. व्यावसायिक उलाढाल, औद्योगिक वसाहतीतील कामकाज यांतून यश मिळेल. औद्योगिक उत्पादन तसेच औद्योगिक कामगार यांनाही प्रगतीपर काळ राहील. धार्मिक, आध्यात्मिक कामातून समाधान मिळवाल. भागीदारी, कोर्ट कामकाज व वकिली यांतून यश मिळेल. वैवाहिक जुळवणी साध्य होईल. चिकाटी व जिद्दीच्या जोरावर बहुतेक आघाड्यांवर प्रयत्नांचा रेटा चालू ठेवू शकाल. १४-१६ दरम्यान अचानक धनलाभ संभवतो. १७, १८ ला व्यवसायातून बरकत राहील. शुभांक ः ५७.
वृषभ : आरोग्यात सुधारणा राहील. बागायत उत्पादन, नवीन लागवड, तसेच डेअरी व्यवहार याबाबतही अनुकूल अशा घडामोडी घडतील. उपवरांचे विवाह जुळण्याचे संकेत मिळू लागतील. वाहनचालकांना सरकारी क्षेत्रात संधी मिळण्याची शक्यता. नवीन करार-मदार, आध्यात्मिक-धार्मिक कामकाज यांबाबत मानसिक उत्साह लाभेल. सूचक व्यावसायिक निर्णयांचे स्वागत होईल. आजोळचे चांगले सौख्य लाभेल. १४-१६ दरम्यान कंत्राट व्यवहार सफल होतील. १७, १८ ला वाहतूक व्यवसायात प्रगती. १९, २० ला सूचक स्वप्ने पडतील. शुभांक ः ४२.
मिथुन : भागी व्यवसाय, कोर्टकचेरी कामे, परदेशगमन यांबाबत प्रगती जाणवू लागेल. विद्यार्थी, कलावंत यांना यश. कपडा व्यवसाय, गिफ्ट आयटम, क्रीडा साहित्यविक्री यातून चांगला प्रतिसाद राहील. गर्भवतींना अनुकूल काळ राहील. नोकरदारांना बढतीची शक्यता. उपवरांना चांगले प्रस्ताव येतील. पशुपालन, डेअरी व्यवहार यातून गुंतवणूक वाढविणे शक्य होईल. मित्रवर्ग, नातेवाईक यांच्याशी संपर्क वाढवू शकाल. बाजारपेठेतून नवीन कंत्राट, ऑर्डर्स प्राप्त होतील. १४-१६ दरम्यान आर्थिक गुंतवणूक साध्य. १७, १८ ला हॉटेलमधून मोठी प्राप्ती. १९, २० ला सूचक स्वप्ने पडतील. शुभांक ः ४०.
कर्क : जोडीदार व सहकारी यांच्याशी चांगले संतुलन जुळून येईल. कोर्टकचेरी, भागीदारी, औद्योगिक घडामोडी यांतून उत्साही वातावरण राहील. मुलांची वागणूक सुधारेल. उच्चशिक्षण, संशोधन, पीएच.डी.बाबत अनुकूल काळ राहील. लेबर, कंत्राटदार, लाकूड व्यवसाय यांबाबत चांगला विस्तार साधता येईल. शोरूम व्यवसाय, ब्युटीपार्लर, कपडा मार्केट यातून मोठी उछाल राहील. वृत्तपत्र व्यवसाय, संपादक, लेखनिक यांना उत्कर्षकारक काळ राहील. १४-१६ दरम्यान डेअरी व्यवसायात यश. १७, १८ ला उपवरांचे विवाह जुळतील. १९, २० ला पाण्याकडे जपून. शुभांक ः ८२.
सिंह : घरगुती वातावरण धार्मिक व मंगलमय होऊ लागेल. देवस्थान कमिटी, धार्मिक समारंभ यांबाबत नव्या योजना राबवू शकाल. नवीन वाहन खरेदी, वास्तूनिर्मिती यांबाबतही समाधानकारक हालचाली सुरू होतील. वृत्तपत्र व्यवसाय, जाहिरातदार, फोटोग्राफी, छपाई यातून प्रगतीकारक घटना अनुभवास येतील. विद्यार्थ्यांना मरगळ झटकून लक्ष केंद्रित करता येईल. वरिष्ठांसमवेत चांगला संपर्क व सहयोग निर्माण करू शकाल. १४-१६ दरम्यान खेळातून लाभ. १७, १८ डॉक्टरी व्यवसायाला अनुकूल. १९, २० ला कला प्रांतातून यश. शुभांक ः २३.
कन्या : कौटुंबिक व्यवहारात चांगली सुबत्ता निर्माण होईल. महत्त्वाच्या बैठका, सल्लामसलत तसेच आर्थिक देव-घेव यांबाबत प्रगतीपर काळ राहील. बँकिंग, विमा, शेअर्स सेक्टरमधून मनाजोगी उलाढाल व गुंतवणूक करू शकाल. सराफी व्यवहार, भांड्याचे व्यापार यातून चांगली विक्री साधता येईल. सरकारी कार्यालयीन कंत्राटातून रक्कम हाती चढेल. विवाहाचे प्रस्ताव सफल होतील. स्पर्धा, खेळ यातून नेत्रदीपक यश मिळवू शकाल. वादसंवाद सफल होतील. १४-१६ दरम्यान मित्रांची मदत लाभेल. १७, १८ ला मच्छीमारीत यश. १९,२० ला निर्यात व्यवहारात प्राप्ती. शुभांक ः ४८.
तूळ : आत्मविश्वास वाढीस लागेल. कर्तृत्वाला चांगली धार चढेल. वकिली, न्यायदान, पोलीसदल वगैरे क्षेत्रात चांगला मानसन्मान लाभेल. कौटुंबिक व्यवहारात अनुकूल काळ राहील. आर्थिक संचय वाढीस लागेल. हॉटेल, उपहारगृहे, खाणावळ, केटरिंग यातून चांगली प्राप्ती राहील. लाकडी वखार, फर्निचर यातून चांगली पकड निर्माण करता येईल. इलेक्ट्रॉनिक्स, आय.टी. क्षेत्रातून नव्या संधी निर्माण होतील. धार्मिक आवड वाढीस लागेल. १४-१६ दरम्यान कंत्राट, करार यशस्वी होतील. १७, १८ शोरूम्सना अनुकूल. १९, २० ला सूचक स्वप्नांतून दिलासा. शुभांक ः ८१.
वृश्चिक : धंदाउदीम, व्यावसायिक बाजारपेठ, बँकिंग भांडवल उभारणी यातून विशेष सफलता लाभेल. पर्यटन व्यवहार, अंतरराज्य माल वाहतूक यासंबंधीचे व्यवहार तडीस नेऊ शकाल. मानसिक उभारी मिळेल. आत्मविश्वासाला नवी अनुकूल दिशा लाभेल. धार्मिक- आध्यात्मिक मार्गातून अकल्पित असा आनंद मिळवू शकाल. नोकरदार, उच्चाधिकारी यांना स्थिरता लाभेल. गृहसुधार योजना, जलाशय व्यवसाय यातून भाग्यवृद्धी होईल. १४-१६ दरम्यान आर्थिक कामकाज सफल होईल. १७, १८ ला फिरत्या व्यवहारात यश. १९, २० ला शोरुम्समधून यश. शुभांक ः ०९.
धनू : धार्मिक, आध्यात्मिकबाबतीत चांगली संपन्नता राहील. नित्याच्या व्यापापायी बरीच शक्ती व वेळ खर्ची घालावा लागेल. वाहन, घरदार याबाबत खर्चाचे अंदाज चुकतील. व्यावसायिक मित्रांपासून चांगले सहकार्य लाभेल. बागायत लागवड, फळे-फुले व्यापार यातून मनाजोगी प्रगती जाणवेल. भावी नियोजनाबाबत योग्य विचारांती निर्णय घेण्यात सफलता मिळवू शकाल. कमिशन एजन्सी, बाजारपेठ, कार्यालयीन व्यवस्था यातून यश. १४-१६ दरम्यान धंदा- व्यवसायात लाभ. १७, १८ ला हॉटेल व्यवसायातून चांगली बरकत. १९, २० ला कला प्रांतातून यश. शुभांक ः १७.
मकर : सर्वतोपरी लाभदायक काळ राहील. नव्या ओळखी, नाती-गोती, हितसंबंधी यांची चांगली साथसंगत राहील. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवणे शक्य होईल. छोट्या व्यावसायिकांना प्रयत्नांचा योग्य आरखडा फलदायी ठरू शकेल. आत्मविश्वास द्विगुणित झाल्याने मोठ्या जबाबदार्‍या सहजतेने पार पाडू शकाल. शैक्षणिक क्षेत्र, उच्चशिक्षित यांना स्थिरता लाभेल. व्यावसायिक संपर्क वाढतील व हितकारक योजना राबवू शकाल. १४-१६ दरम्यान प्रवासी कामात संधी. १७, १८ ला भागीदारीतून यश. १९, २० ला हॉटेल व्यावसायिकांना यश लाभेल. शुभांक ः ८१.
कुंभ ः व्यावसायिक, औद्योगिक, राजकीय क्षेत्रातून चांगले बस्तान बसविण्यात सहजता व चांगली सफलता मिळवू शकाल. बढती, बदली, शिफारस यांबाबत अनुकूल काळ राहील. परदेशगमन, मल्टी नॅशनल क्षेत्र, व्यवसाय यांतून जोरदार संधी लाभेल. कपडा बाजार, होजिअरी, कमिशन एजन्सी, जाहिरातदार, माल वितरण व बचत योजना, भविष्य निर्वाह निधी, गोदाम व्यवहार यातून चांगला प्रतिसाद मिळेल. निर्यात माल वितरण वाढीव राहील. १४-१६ दरम्यान यांत्रिक खरेदी साधेल. १७, १८ ला सूचक स्वप्ने पडतील. १९, २० ला हॉटेल व्यवसायातून विशेष लाभ. शुभांक ः १८.
मीन : भाग्यवर्धक काळाचा विशेष टप्पा सुरू होईल. नव्या व्यावसायिक संधी, नवी नोकरी यांबाबत अनुकूल काळ राहील. जलाशय व्यवहार, मच्छीमारी, धार्मिक अनुष्ठाने यांबाबत गतिमान काळ राहील. देवालये जीर्णोद्धार कमिटी व्यवस्थापन, निवडणुका यांबाबत प्रगतीपर घटना जुळतील. धार्मिक व्यवहार, घरगुती देवकार्य, मंगलकार्य यांतून उत्साही व आनंदी वातावरण राहील. संततीच्या हितासाठी योग्य पावले उचलण्यात सफल व्हाल. १४-१६ दरम्यान धंदाउदिमास अनुकूल. १७, १८ ला खेळ व्यवहार सफल होईल. १९, २० ला खरेदी घडेल. शुभांक ः ९४.