राशिभविष्य

0
126

मेष : भागीदारी व्यवसायात प्रगतीकारक घटना घडतील. कपडा, होजिअरी, ब्युटीपार्लर यातून ग्राहकांची गर्दी राहील. मित्रपरिवाराचे सहकार्य मध्यम राहील. खेळाडू, कोच, फिसिओ यांना अनुकूल काळ राहील. राजकीय क्षेत्रात विरोधक प्रबळ बनतील. हॉटेल, उपहारगृहे, खानावळ यांतून समाधानकारक काळ राहील. कारागिरी, सोने-चांदी व्यवहार वेग पकडतील. कार्यालयीन व्यवहारात कनिष्ठ वर्ग कर्मचार्‍यांशी मतभेद व आडमुठे धोरण जाणवून येईल. २१-२४ दरम्यान लांबचे प्रवास, व्यावसायिक भेटी यांची रेलचेल राहील. २५, २६ ला वैयक्तिक निर्णय सफल होतील. शुभांक ः ९१.
वृषभ : डॉक्टरी व्यवसाय, फार्मसी यातून चांगली गती राहील. शेअर्स, सीए यांना प्रगतीकारक घटनांचा अनुभव येईल. आरोग्यात महत्त्वाची अनुकूल अशी सुधारणा दिसून येईल. बागायत उत्पादन, फुले-फळे विक्री, तसेच डेअरी व्यवहार याबाबतही अनुकूल अशा घडामोडी घडतील. मोलकरणीच्या शोधात यशस्वी व्हाल. वडिलार्जित व्यवसायात नवी आश्वासने व आवाहने विचारात घेऊ शकाल. धार्मिक कार्यात चांगला सहभाग घेऊ शकाल. २१-२४ दरम्यान महत्त्वाचे सहकार्य प्रगती गाठून देईल. २५, २६ ला प्रवासी व्यवसाय यशात राहील. २७ ला विवाह जुळवणी शक्य होईल. शुभांक ः २४.
मिथुन : करमणूक क्षेत्र, खेळाडू, सीए, शेअर्स यांतून यशस्वी काळ राहील. संततीची प्रगती समाधानकारक राहील. इंटेरिअर डेकॉर्स, समुद्र पर्यटन यातून चांगली प्राप्ती हाती चढेल. सप्ताहअखेरीस वरिष्ठांच्या गाठीभेटी घडून येतील. नोकरदारांना बढतीची शक्यता. वाहतूक विभागातून बदल घडून येतील. परमिट व्यवहार तडीस लागेल. बांधकाम व्यवहार, इस्टेट डेव्हेलोपर्स यांना सुसंधी लाभेल. बाजारपेठेतून नवीन कंत्राट, ऑर्डर्स प्राप्त होतील. २१-२४ दरम्यान मालविक्रीतून मोठे लाभ हाती चढतील. २५, २६ ला मित्रांच्या गाठीभेटी घडतील. २७ ला खरेदी साध्य होईल. शुभांक ः ४१.
कर्क : घरगुती वातावरण उत्साही राहील. कौटुंबिक घटकांचा मेळामेळ व संपर्क यातून समाधान प्राप्त होईल. बाजारपेठ उत्पादन, मालविक्री यातून अनुकूल अशी उलाढाल राहील. नवी वाहन खरेदी, माल वाहतूक व्यवसाय दरम्यान प्रगतीकारक घटना घडतील. वैवाहिक जुळवणीत पुढाकार घेऊ शकाल. हॉटेल वर्गाला गुंतवणूक लाभदायक ठरेल. कोर्टकचेरी, वकिली, भागीदारी, औद्योगिक घडामोडी यांतून उत्साही वातावरण राहील. जास्त संशयी राहू नका. २१-२४ दरम्यान मच्छीमारांना मोठे यश. २५, २६ ला मार्केटिंगमधून वाढ. २७ ला नव्या ओळखी होतील. शुभांक ः ४२.
सिंह : राशिस्वामी रवि तृतीयस्थानी असल्याने विशेष प्रयत्न न करता महत्त्वाच्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात अनुकूल काळ राहील. वृत्तपत्र व्यवसाय, बुक सेलर, फोटोकॉपी, नोटरी यांना लाभदायक काळ राहील. जाहीरनामे, ना हरकत दाखले यातूनही सफलता राहील. स्त्रियांना नव्या व्यावसायिक अथवा नोकरीच्या संधी लाभतील. धार्मिक व्यवहार, देवालय समिती, जीर्णोद्धार वगैरे कार्यातून मानाचा केंद्र बिंदू प्राप्त होईल. २१-२४ दरम्यान निर्यात, पर्यटन व्यवहारातून मोठे लाभ. २५, २६ ला व्यावसायिक प्रवास जुळतील. २७ ला मच्छीमारीत यश. शुभांक ः ७२.
कन्या : कौटुंबिक व आर्थिक व्यवहारात चांगली अनुकूल अशी स्थिती राहील. आवक वाढेल. मुबलक भांडवल हाती चढेल. खरेदी, गुंतवणूक, दागदागिने खरेदी, सुबत्ता निर्माण होईल. यातून कौटुंबिक प्रश्‍न तडीस नेऊ शकाल. सभा, समारंभ, मेळावे यातून पुढाकार घेऊ शकाल. महत्त्वाच्या बैठका, दलाली, बँकिंग, विमा, शेअर्स सेक्टर तसेच ब्रोकरेज, हवाला यातून मनाजोगी उलाढाल व प्राप्ती साध्य होईल. कपडा, भांड्याचे व्यापार यातून चांगली विक्री साधता येईल. २१-२४ दरम्यान मित्रांची मदत उपयुक्त ठरेल. २५, २६ ला अचानक धनलाभाची शक्यता. २७ ला निर्यात व्यवहारात प्राप्ती. शुभांक ः ४६.
तूळ : नित्याच्या कामकाजात व्यस्त राहू शकाल. आत्मविश्वास वाढीव राहिल्याने बरीच कामे हातावेगळी करणे शक्य होईल. कौटुंबिक व्यवहार, आर्थिक देव-घेव, वसुलीबाबत योग्य पावले उचलू शकाल. मित्रांच्या सहयोगाने कर्तृत्वाला चांगली धार चढेल. वरिष्ठ सहकारी वर्गाशी थोडे मतभेद निर्माण होऊ शकतील. वकील, न्यायाधीश, पोलीस दल, आयटी, मेकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे क्षेत्रांत चांगली संधी उपलब्ध होईल. निर्यात व्यवहार सुधारतील. २१-२४ दरम्यान व्यावसायिक घडामोडी वाढतील. २५, २६ उपवरांना अनुकूल. २७ ला अचानक धनलाभाची शक्यता. शुभांक ः ३९.
वृश्चिक : बाराव्या स्थानातील ग्रहांची मैफल प्रवास, जादा कामकाज यातून व्यग्र ठेवणारी असेल. धंदाउदीम, व्यावसायिक बाजारपेठ, बँकिंग, भांडवल उभारणी याबाबत बरीच धावपळ व उलाढाल समाधानकारक रीतीने हाताळू शकाल. टूर्स आयोजन, स्पर्धा सहभाग यातून विशेष सफलता लाभेल. कागदपत्र व्यवहार करताना योग्य दक्षता घ्यावी. भुसारी व्यवहार, स्टेशनरी, प्रिंटिंग तसेच पर्यटन व्यवहार, आंतर राज्य मालवाहतूक प्रगतीकारक. २१-२४ दरम्यान आर्थिक प्राप्तीत वाढ. २५, २६ ला दरम्यान फिरत्या व्यवहारात वाढ. २७ ला व्यावसायिक तेढ वाढण्याची शक्यता. शुभांक ः ९६.
धनू : मित्रपरिवार, नातेसंबंध, नव्या ओळखी यातून समाधानकारक वाटचाल राहील. विद्यार्थी, संततीबाबत हितवर्धक काळ असेल. खेळ, स्पर्धा, क्रीडा संकुल कर्मचारी व अधिकारी यांना नव्या संधी व आयोजनाची जबाबदारी घ्यावी लागेल. धार्मिक, आध्यात्मिक बाबतीत चांगली प्रगतीकारक वाटचाल राहील. सप्ताहअखेरीस वरिष्ठ अधिकारी वर्गासमवेत प्रवास व वैचारिक चर्चा यातून संपन्नता राहील. भागीत हिशेब चोख ठेवा. २१-२४ दरम्यान घरगुती व्यवहारात लाभ. २५, २६ ला करमणूक व्यवसाय सफल. २७ ला रोजगार प्रांतात यश. शुभांक ः ७१.
मकर : कर्तृत्व वेग पकडणारे राहील. व्यावसायिक तसेच खाजगी व्यवहारातून सर्वोतोपरी लाभदायक काळ राहील. नव्या ओळखी, वरिष्ठ स्तरावरील मदत यातून मनासारखा प्रतिसाद लाभेल. कार्यालयीन क्षेत्रातून महत्त्व वाढेल. अधिकारशाहीचा योग्य उपयोग करू शकाल. बुधाचे राशांतर व्यापारी वर्गाला हितकारक संधी देणारे ठरेल. आर्थिक देव-घेव, येणावळीबाबतीत योग्य नियंत्रण ठेवणे शक्य होईल. छोट्या व्यावसायिक वर्गाला नवी दिशा लाभेल. २१-२४ दरम्यान छोट्या प्रवासी कामात संधी. २५, २६ ला भागीदारीत यश. २७ ला करमणूक व्यावसायिकांना प्राप्ती. शुभांक ः ६१.
कुंभ ः घरगुती संततीविषयक बरेच निर्णय घेऊन ते कार्यान्वित करण्यात सहजता व सफलता प्राप्त करू शकाल. व्यावसायिक, औद्योगिक, राजकीय क्षेत्रातून विस्तार जाणवेल. राजकीय क्षेत्रातून नवी संधी लाभेल. कला, सराफी, कारागिरी, कुटीरोद्योग यातून प्रगती गाठण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल. नोकरदारांस बढती-बदलीची शिफारस शक्य होईल. परदेशगमन, मल्टी नॅशनल क्षेत्र, जलाशय, हॉटेलमधून नवी संधी लाभेल. कपडा बाजार तेजीत राहील. २१-२४ दरम्यान कौटुंबिक खर्च वाढेल. २५,२६ ला सूचक स्वप्ने पडतील. २७ ला हॉटेल व्यवसायात लाभ. शुभांक ः २८.
मीन : व्यावसायिक गुंतवणुकीतून मोठे धनलाभ होतील. माल साठवण, गोदाम भरणी यातून मोठी उलाढाल यशस्वी होईल. परदेशगमन, पासपोर्ट व्यवहार यातून अनुकूल असा विशेष टप्पा सुरू होईल. नव्या व्यावसायिक संधी, नवी नोकरी याबाबत अनुकूलता लाभेल. बुधाचे राश्यांतर नवे करार, कंत्राट संबंधात मोठ्या प्रभूतीशी भेट घडवून आणील. देवस्थान व्यवहार कमिटी निर्मिती तसेच धार्मिक अनुष्ठाने यांबाबत समाधानकारक काळ राहील. २१-२४ दरम्यान संततीच्या प्रगतीस अनुकूल. २५, २६ ला आर्थिक वाढ. २७ ला करमणूक, स्पर्धातून सुयश. शुभांक ः ७२.