राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

0
42

रणजीत सिंह हत्या प्रकरणात १९ वर्षांनंतर पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमसह ४ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने राम रहीमला ३१ लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच अन्य ४ दोषींना देखील दंड ठोठावला आहे. दंडातील अर्धी रक्कम पीडित कुटुंबाला दिली जाईल.

१० जुलै २००२ रोजी डेराच्या उच्चस्तरीय व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजीत सिंह यांची हत्या झाली होती. राम रहीम व्यतिरिक्त अन्य दोषींमध्ये पंजाब पोलीस कमांडो सबदील सिंग, अवतार सिंग, जसबीर सिंग आणि कृष्णलाल यांचा समावेश आहे.