रानडुकरांना उपद्रवी प्राणी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू

0
247

राज्यातील शेतकर्‍यांच्या शेती-बागायतीचे रानडुकरांकडून नुकसान केले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसतो. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने रानडुकरांना उपद्रवी प्राणी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

रानडुक्कर हे राज्यातील शेतीत घुसून पीक फस्त करण्याबरोबरच शेतीची नासाडी देखील करतात. त्यांना उपद्रवी प्राणी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. गोवा राज्य वन्यजीव मंडळाने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाला राज्यातील रानडुक्कर हे उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे. हे रानडुक्कर मोठ्या प्रमाणात शेतीची नुकसान करीत असल्याचे गोवा राज्य वन्यजीव मंडळाने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राष्ट्रीय पक्षी मोर, राज्य प्राणी गवारेडा व माकडांची एक विशिष्ट प्रजाती हे देखील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करीत असल्याचे आढळून आले आहे; मात्र त्यांना उपद्रवी न ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.