राणेंना आजीवन कॅबिनेट दर्जा; याचिकेवर २५ रोजी सुनावणी

0
22

राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना दिलेल्या आजीवन कॅबिनेट दर्जाच्या निर्णयाला ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात एका जनहित याचिकेव्दारे आव्हान दिले असून, या याचिकेवर २५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ६ जानेवारीच्या बैठकीत राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.