राज्य सरकारने 7 नोव्हेंबरला सरकारी रोख्यांची विक्री करून 100 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर आता, येत्या 13 नोव्हेंबर रोजी आणखी 100 कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कर वसुली अंतर्गत जारी केलेल्या मासिक 281.63 कोटी रुपयांच्या निधीमुळे राज्य सरकारला थोडा दिलासा मिळाला आहे.