राज्य सरकारकडून ‘गिफ्ट’ची स्थापना

0
64

राज्य सरकारने केंद्रीय स्तरावरील नीती आयोगाच्या धर्तीवर गोवा इन्स्टिट्यूशन ऑफ फ्युचर ट्रास्फॉर्मेशन (गिफ्ट) या संस्थेची स्थापना केली आहे. राज्य नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यांकन खात्याकडून यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या संस्थेचा कारभार नीती आयोगाच्या धर्तीवर चालणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री या गिफ्ट संस्थेचे चेअरमन असतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी नीती आयोगाच्या धर्तीवर संस्था स्थापन करण्याची घोषणा केली होती.