राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
2

राज्य नागरी सेवेतील 17 अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काल जारी करण्यात आला आहे. पर्यटन खात्याचे संचालक म्हणून केदार नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अरविंद बुगडे यांची संयुक्त सचिव कायदा, विवेक नाईक यांची संयुक्त सचिव शिष्टाचार, दामोदर मोरजकर यांची सचिव – सैनिक कल्याण खाते, सिद्धिविनायक नाईक यांची मुख्याधिकारी मुरगाव नगरपालिका मंडळ, दिपेश प्रियोळकर यांची व्यवस्थापकीय संचालक – एसटी वित्त आणि विकास महामंडळ, संगिता परब – अतिरिक्त आयुक्त – राज्य कर, फ्रान्सिकिना ओलिव्हेरा यांची सदस्य सचिव – गोवा फुटबॉल विकास मंडळ, अक्षय पोटेकर यांची संचालक (प्रशासन) डीजीपी, रोहन कासकर यांची संचालक – न्यू आणि रिनवेबल एनर्जी, सचिन देसाई यांची संचालक – गोवा राज्य फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा, प्रेमराज शिरोडकर यांची सचिव – गोवा रेरा, कबीर शिरगावकर यांची निबंधक – सहकार खाते, सागर गावडे यांची व्यवस्थापकीय संचालक – गोवा शिक्षण विकास महामंडळ, प्रितीदास गावकर यांची खास जमीन संपादन आणि वसुरी अधिकारी ईडीसी, मंगलदास गावकर यांची संचालक (प्रशासन) क्रीडा प्राधिकरणावर नियुक्ती करण्यात आली आहे.