राज्यात २४ तासांत नवे ३५ कोरोनाबाधित

0
27

राज्यात गेल्या २४ तासांत नवे ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६४७ एवढी झाली आहे. तसेच राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३३३० एवढी झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७५ टक्के एवढे झाले आहे. गेल्या २४ तासांत ११ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, तर २४ जणांनी गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.