राज्यात मागील २४ तासांत नवे १४३ कोरोनाबाधित सापडले असून, एका रुग्णाला इस्पितळात दाखल करावे लागले आहे. मागील २४ तासांत १३३० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी १४३ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले. मागील २४ तासांत १५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सक्रिय रुग्णसंख्या आता ७८६ पर्यंत खाली आली आहे. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१५ टक्के एवढे आहे.