राज्यात यंदा ३३ टक्के जास्त पावसाची नोंद

0
98

राज्यात मोसमी पाऊस इंचाचे दीड शतक गाठण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असून राज्यात आत्तापर्यंत १४८.७० इंच पावसाची नोंद झाली आहे. सत्तरी, सांगे, पेडणे, साखळी, ओल्ड गोवा, फोंडा या तालुक्यात पावसाने इंचाचे दीड शतक यापूर्वीच पूर्ण केले आहे.

राज्यात यावर्षी मोसमी पावसाचे दोन आठवडे उशिराने आगमन झाले होते. त्यामुळे यावर्षी यंदाही तुटीचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. तथापि, यावर्षी पावसाने सर्व अंदाज फोल ठरवले आहेत. मागील चार वर्षे सलग तुटीचा मोसमी पाऊस पडल्यानंतर या वर्षी आत्तापर्यंत ३३ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात मागील पाच दिवसापासून मोसमी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. राज्याच्या विविध भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. मागील चोवीस तासात सांगे येथे १.०२ इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा, पेडणे, साखळी आणि केपे येथे पावसाची सरी कोसळल्या आहेत. समुद्रात वादळी जोरदार वादळी वारे वाहत असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.