राज्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक

0
31

राज्यात चोवीस तासांत नवीन २०० कोरोनाबाधित आढळून आले असून, राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण १४.३९ टक्के एवढे आहे.

राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ८७७ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १३८९ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले, त्यात २०० जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले. मागील चोवीस तासांत दोन रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून, एका रुग्णाला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत आणखी १२२ जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के एवढे आहे.