राज्यात कोरोनाने दोघा जणांचा मृत्यू

0
25

राज्यात कोरोनाचा धोका किंचित वाढत असून, सलग दुसर्‍या दिवशी राज्यात कोरोना बळींची नोंद झाली. कोविडच्या संसर्गामुळे काल राज्यात दोघा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३८४१ एवढी झाली आहे.

मागील २४ तासांत १३०५ जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली, त्यापैकी ११२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. यापैकी ७ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, तर १०५ रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत १९१ रुग्ण कोविडमुक्त झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या ८८२ एवढी आहे. सध्या संक्रमण दर हा ८.५८ टक्के एवढा आहे.