राज्यात कोरोनाचे ४११ सक्रीय रुग्ण

0
24

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून कोरोनामुळे एकाच्याही मृत्यूची नोंद नाही. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४११ झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३३६३ एवढी आहे. राज्यात काल शुक्रवारी ७३ कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८८ टक्के एवढे आहे.

कोरनामुक्त झाल्याने इस्पितळातून २ जणांना घरी पाठविण्यात आले. तसेच कोरोनाची लक्षणे जाणवल्याने ८ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ३९ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.