राज्यात आत्तापर्यंत ८८.४६ इंच पाऊस

0
147

राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्यास प्रारंभ झाला असून मागील चोवीस तासात १ इंच पावसाची नोंद झाली आहे. केपे येथे सर्वाधिक ३.५१ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ८८.४६ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १६ टक्के जास्त आहे.

चोवीस तासांत फोंडा येथे १.७३ इंच, सांगे येथे १.५३ इंच, पेडणे येथे १.२१ इंच पावसाची नोंंद झाली आहे. काणकोणात पाऊस शतकाच्या उंबरठ्यावर असून तिथे ९९.४८ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे पावसाने इंचाचे शतक पूर्ण केले असून पेडण्यात १०३.३४ इंच पावसाची नोंद झाली आहे. ओल्ड गोवा येथेही मोसमी पाऊस इंचाच्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.