राज्यात आणखी तिघांचा मृत्यू

0
144

>> बळींची संख्या ६७, नवीन पॉझिटिव्ह १९१

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी तीन रुग्णांचे मडगाव येथील कोविड इस्पितळात काल निधन झाले असून कोरोना बळींची संख्या ६७ झाली आहे.

नवीन १९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सध्याच्या रुग्णांची संख्या २०९५ एवढी झाली आहे. तर राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह एकूण रुग्णांची संख्या ७६१४ एवढी झाली आहे. १६६ कोरोना पॉझिटिव्ह बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४५३ एवढी झाली आहे.

वास्को येथील ६७ व ७८ वर्षीय दोघांचे गुरूवारी निधन झाले. या रुग्णांना २७ जुलैला इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले होते. वास्को येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचे सकाळी १० च्या सुमारास निधन झाले. त्याला ३१ जुलैला इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले होते.

चिंबलमध्ये नवे ३० रुग्ण
चिंबलमध्ये नवे ३० रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या १२० तर खोर्लीत नवे ९ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ५२ झाली आहे.

मयेत नवे ९ रुग्ण
मये परिसरात नवीन ९ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १९ झाली आहे. कोलवाळ येथे नवीन १ रुग्ण आढळला आहे. म्हापसा येथे नवीन ८ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ७६ झाली आहे. हळदोणा १, कांदोळी २ रुग्ण तर पेडणे येथे नवीन १ रुग्ण आढळून आला आहे.

मडगावात नवे २० रुग्ण
मडगावात २० रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १५६ झाली आहे. कुडचडेत ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ३५ झाली आहे. बाळ्ळीत ४ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ५७ झाली आहे. चिंचिणीत १, कुडतरीत २ रुग्ण आणि लोटली येथे नवीन १ रुग्ण आढळला.