राज्यात आजपासून मच्छिमारी बंदी लागू

0
59

राज्यातील ६१ दिवसांच्या मच्छिमारी बंदीला मंगळवार दि. १ जूनपासून प्रारंभ होत आहे. राज्यातील मच्छिमारी बंदीच्या पार्श्‍वभूमीवर मच्छिमारांनी आपल्या नौका जेटीवर नांगरून ठेवल्या आहेत.

कोरोनामुळे मागील वर्षी मच्छिमारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यंदा देखील तीच परिस्थिती कायम राहिली. मे महिन्यात लागू केलेल्या संचारबंदीचा मोठा फटका मच्छिमारांना बसला. संचारबंदीमुळे बहुतांश भागातील मासळी मार्केट बंदी होती. राज्यात मच्छिमारी बंदीच्या काळात राज्यात मासळीचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे परराज्यातून मासळी आणली जाते.