>> पर्यटन मंत्री रोहन खंवटेंची खात्याचे अधिकारी व पोलिसांना सूचना
प्रकारांमुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस व संबंधित यंत्रणांनी या गैरप्रकारांवर योग्य कारवाई करून समुद्रकिनारे सुरक्षित व स्वच्छ बनविण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी सूचना पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल केली.
रोहन खंवटे यांनी पर्यटन खाते, पर्यटन विकास महामंडळ, पोलीस खाते व इतर अधिकार्यांची पर्वरी येथे काल बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित व स्वच्छ बनविण्यासाठी कार्यरत होण्याची सूचना करण्यात आली. या बैठकीला पोलीस महासंचालक जसपाल सिंग, पर्यटन खात्याचे संचालक मिनिनो डिसोझा व इतरांची उपस्थिती होती.
राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित आणि स्वच्छ बनविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यातील समुद्रकिनार्यांवरील गैरप्रकार घडत असल्याचे आढळून येत असून, पर्यटकांची सतावणूक होत आहे. पर्यटकांना रस्त्यांवर अडवून दंड ठोठावण्याचे प्रकार घडत आहे. राज्यात येणार्या पर्यटकांना योग्य वागणूक देण्याची गरज आहे, असे खंवटे यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.
राज्यातील समुद्रकिनार्यांवर पर्यटकांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. किनार्यांच्या स्वच्छतेकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांनी बेकायदा प्रकारांवर कारवाई करण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या शॅक मालक, जलक्रीडा चालकांनी पर्यटकांना चांगली सेवा, सुविधा देण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.