राज्यातील संचारबंदीत २६ जुलैपर्यंत वाढ

0
47

राज्यातील संचारबंदीमध्ये आणखी आठ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीमध्ये सोमवार २६ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यत वाढविण्याचा आदेश काल जारी केला आहे.
राज्यातील संचारबंदीचा आदेश सोमवार १९ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यत कार्यान्वित होता. आता जिल्हा प्रशासनाच्या नव्या आदेशामुळे संचारबंदी २६ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

राज्यातील संचारबंदीमध्ये सध्या दर आठ दिवसांनी वाढ केली जाते. संचारबंदीत वाढ करताना व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी काही नियम शिथिल केले जात आहेत. राज्यात दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यत खुली आहेत. हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू आहे. तसेच, हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमतेने ग्राहकांना सेवा दिली जात आहे.
राज्यात मे २०२१ पासून संचारबंदी सुरू आहे. गेल्याकाही दिवसांपासून कोरोना संक्रमणाचे राज्यात प्रमाण कमी झाल्याचे पाहून संचारबंदी शिथिल करून व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातील संचारबंदीमध्ये नियमांची तपासणी केली जात नाही. संचारबंदी केवळ नाममात्र, बनलेली आहे असेही दिसून येत आहे.