राज्यातील शिक्षकांना लसीकरणाची सूचना

0
45

शिक्षण खात्याने एक आदेश जारी करून राज्यातील सर्व विद्यालयांतील शिक्षक आणि इतर कर्मचार्‍यांना लसीकरण करून घेण्याची सूचना केली आहे. कुठल्याही कारणास्तव लसीकरण करून न घेतलेल्या शिक्षक किंवा इतर कर्मचार्‍याला आरटीपीसीआर प्रमाणपत्र दर आठवड्याला सादर करावे लागणार आहे. शिक्षक वर्गाने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे लसीकरण करून घेतले पाहिजे. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या हितार्थ लसीकरण आवश्यक आहे, असे शिक्षण खात्याचे संचालक डी. आर. भगत यांनी म्हटले आहे.