राज्यातील तिसरी खाण सुरू

0
5

राज्यात तिसऱ्या खनिज खाणीवर खनिज उत्खननाचे काम सुरू झाले आहे. साळगावकर शिपिंग कंपनीने शिरगाव येथील खनिज खाणीवर खनिज उत्खनन सुरू केले आहे, अशी माहिती खाण खात्याचे संचालक नारायण गाड यांनी काल दिली.
राज्य सरकारने खनिज लिजांचा लिलाव केल्यानंतर आत्तापर्यंत तीन खनिज खाणी सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी, डिचोली येथील वेदांत, थिवी येथे फोमेंतो कंपनीने खनिज खाणीवर खनिज उत्खनन सुरू केले आहे. शिरगाव येथील देवी लईराई देवालयापासून 150 मीटर बफर झोन आणि धोंडाच्या तळीपासून 80 मीटर बफर झोन निश्चित करण्यात आला आहे. या बफर झोनमध्ये खनिज उत्खनन करण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती खाण संचालक नारायण गाड यांनी दिली.