राज्यातील काही भागांत पावसाचा शिडकावा

0
9

राज्यातील पणजीसह साखळी, ओल्ड गोवा व विविध भागात चोवीस तासांत पावसाचा शिडकावा झाला आहे. आंध्रप्रदेशजवळ बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यातील हवामानात बदल झाला आहे. राज्यातील थंडी गायब झाली असून किमान तापमानात वाढ झाली आहे. पणजी येथे २४.६ अंश सेल्सिअस आणि मुरगाव येथे २५ अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे. तर , जास्तीत जास्त तापमान पणजी येथे ३२ अंश सेल्सिअस आणि मुरगाव येथे ३४ अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे.