राज्यातील आल्वारा भूधारकांना जलद न्याय देणार : महसूलमंत्री

0
25

राज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आल्वारा जमिनींचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, आल्वारा जमीनधारकांना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल बैठकीनंतर दिली.

पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी काल महसूलमंत्री मोन्सेरात यांची भेट घेऊन पर्ये आणि वाळपई मतदारसंघातील आल्वारा जमिनीशी संबंधित विषयांवर चर्चा केली. या दोन्ही मतदारसंघात सुमारे १००० आल्वारा प्रकरणे आहेत आणि आल्वारा जमीनमालकांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे आश्‍वासन मोन्सेरात यांनी दिले.