लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उत्तर प्रदेशसह पक्षाने बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. या सात उमेदवारांपैकी दोन महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने पत्रकार सागरिका घोष, नदीमुल हक, सुष्मिता देव आणि ममता बाला ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.