राजस्थानमधील जयपूरच्या मोनिलेक आणि सीके बिर्लासह राजस्थानमधील 12 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अशा आशयाचा मेल पाठण्यात आला होता. मेलमध्ये इस्पितळातील ़खाटांखाली आणि बाथरूममध्ये बॉम्ब आहे. रुग्णालयात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मारले जाईल. तुम्ही सर्व मृत्यूला पात्र आहात असे लिहिलेले असून मेल पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख ‘लखा टेररिस्ट चिंग अँड कल्टिस्ट’ अशी केली आहे. जयपूरमधील डझनहून अधिक रुग्णालयांना अशा धमक्या आल्या आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोध सुरू केला.सकाळी 8.30 वाजता पोलिसांना मोनिलेक इस्पितळामधून मेलची माहिती मिळाली. 8.45 च्या सुमारास पोलिसांचे पथक मोनिलेक हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
पंजाबात धमकी, एकास अटक
पंजाबमधील अमृतसर येथील श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी बॉम्बची धमकी मिळाली. पोलिसांनी 24 तासांत आरोपीला अटक केली. गुरदेव सिंग, रहिवासी फिरोजपूर असे त्याचे नाव आहे. यावेळी आरोपेीने नमूद केलेल्या अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही धमकी अमृतसर विमानतळावर ईमेलद्वारे देण्यात आली होती. ईमेलमध्ये आरोपीने विमानतळावर 6 बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. आरोपींनी एक कोटी रुपये द्या अन्यथा विमानतळावर बॉम्बस्फोट करू, अशी धमकी दिली होती. अमृतसर पोलिसांच्या सायबर क्राईम टीमने ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू करताना आयपीवरून आरोपीची माहिती मिळाली. गुरदेव सिंग असे आरोपीचे नाव असून तो फिरोजपूरचा रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपी गुरदेवला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एटीएस व बॉम्ब निकामी पथकाद्वारे तपासणी सुरू
रुग्णालयांकडून माहिती मिळालयानंतर त्वरित त्यानंतर एटीएस आणि बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी पाठवण्यात आले. दोन्ही रुग्णालयांमध्ये शोध सुरू करण्यात आला आहे. आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. पाठवणाऱ्याचा आयपी पत्ता शोधला जात आहे. तसेच मोनिलेक रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.