राखीवतेची फाईल आयोगाकडे ः गुदिन्हो

0
108

जिल्हा पंचायत निवडणुकीतील प्रभाग राखिवतेची फाईल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे, अशी माहिती पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनी काल दिली.

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रभाग राखिवतेची फाईल गायब असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डने पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर बोलताना पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की, आपल्या कार्यालयात जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रभाग राखिवतेची फाईल प्रलंबित नाही. प्रभाग राखिवतेची फाईल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा पंचायत निवडणूक आणि प्रभाग राखिवतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.