युक्रेन आणि रशियामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून, काल रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर ७५ क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शांतताप्रिय लोकांवर केलेला हा निर्दयी हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना झेलेन्स्की यांनी केले आहे. त्यांना आम्हाला पृथ्वीवरूनच पुसून टाकायचे आहे, असे म्हणत झेलेन्स्की यांनी रशियाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. सोमवारी सकाळी कीव्हमध्ये पाच स्फोट झाले. शेवचेन्किवस्क्यी जिल्ह्यामध्येही काही स्फोट झाल्याची माहिती कीव्ह शहराचे महापौर विताली क्लित्स्चको यांनी दिली.