रशियाच्या नेव्ही डे परेडमध्ये भारतीय नौसैनिक सहभागी

0
10

काल 28 जुलै रोजी झालेल्या रशियाच्या 328 व्या नेव्ही डे परेडमध्ये भारतीय नौसैनिक सहभागी झाले होते. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीय नौसैनिकांकडून मानवंदना घेतली. युद्धनौका आयएनएस तबरने भारताकडून नौदल दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला.
परेडमध्ये सलामी घेत पुतिन यांनी भारतीय नौसैनिकांना अभिवादन केले आणि नौदल दिन परेडमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कॅप्टन एमआर हरीश आयएनएस तबर या युद्धनौकेचे नेतृत्व करत होते. त्यांच्यासोबत या युद्धनौकेवर 280 सदस्यांचा क्रूही उपस्थित होता.
सेंट पीटर्सबर्ग येथे साजरा होत असलेल्या 328व्या नौदल दिनात सुमारे 200 जहाजांनी भाग घेतला. हे सर्व 2024 पर्यंत नौदलाचा भाग होते. या काळात 15 हजारांहून अधिक सैनिकही उपस्थित होते. परेड संपल्यानंतर सेंट पीटर्सबर्ग आणि रशियन नौदल तळावर संगीत मैफिली, आर्मी बँड आणि आतशबाजीचे आयोजन केले जाईल.
रशियाला पोहोचण्यापूर्वी आयएनएस तबर 17 जुलैला जर्मनीला पोहोचली. जिथे हॅम्बुर्ग बंदरात 3 दिवस मुक्काम केला. जिथे भारतीय नौसैनिकांची जर्मन नौदलासोबत अधिकृत बैठक झाली.