येत्या शनिवार व रविवारी केरळमध्ये पूर्ण लॉकडाऊन

0
34

केरळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असून गेल्या तीन दिवसांत केरळमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शनिवार दि. ३१ जुलै व रविवार दि. १ ऑगस्ट असे दोन दिवस केरळमध्ये पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. केरळमध्ये २६ जुलैला ११,५८६ रुग्ण होते. तर २८ जुलैला ही संख्या २२,०५६ इतकी झाली आहे. केरळमधील ‘लप्पुर’, त्रिशूर, कोझिकोड, एर्नाकुल’, पलक्कड, कोल्ल’, अलाप्पुझा, कन्नूर, तिरुवनंतपुर’ आणि कोट्टाय’मध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ६ सदस्यीय टीम केरळमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही टीम राज्य सरकारसोबत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली आहे.