Home बातम्या युवा धोरणाचा मसुदा तयार

युवा धोरणाचा मसुदा तयार

0

लवकरच शिफारशींसाठी खुला

राज्यातील युवा पिढीसाठी नवे नवे उपक्रम तयार करून त्यांचा विकास साधता यावा यासाठी गोवा सरकारच्या क्रीडा व युवा व्यवहार खात्याने युवा धोरणाचा मसुदा तयार केलेला असून येत्या १५ दिवसांच्या आत तो जनतेला आवश्यक त्या सूचना व शिफारशी करण्यासाठी खुला करण्यात येणार असल्याचे राज्याचे युवा व क्रीडा व्यवहार मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.

जनतेकडून येणार्‍या शिफारशींनुसार युवा धोरण मसुद्यात आवश्यक ते बदल व दुरुस्त्या करण्यात येणार असून नंतर धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यात येणार आहे. हे धोरण तयार करण्यासाठी मंत्री रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक १६ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

हा समुदा तयार करण्यापूर्वी समितीने वेगवेगळ्या राज्यांनी तयार केलेल्या युवा धोरणांचाही अभ्यास केल्याचे तवडकर यांनी सांगितले. धोरणाचा अंतिम मसुदा डिसेंबर अखेरपर्यंत तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.