युवतीच्या खून प्रकरण आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

0
13

दीपाली मेथा या २० वर्षीय युवतीच्या खुनाच्या आरोपाखाली मडगावच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने विजयेंद्र उर्फ चेतन आरोंदेकर याला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याशिवाय ५० हजार रुपये दंड व ती रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

२०१६ मध्ये डिसेंबर महिन्यात खूनाची ही घटना घडली होती. मृत दीपाली मेथा व आरोपी विजयेंद्र आरोंदेकर ही दोघे काणकोण येथील तळपण गावचे रहिवासी आहेत. विजयेंद्र याने दीपालीला आपल्या दुचाकीवरून काब द राम येथे आणले. नंतर गळा दाबून तिला ठार मारले व तो पसार झाला होता. पोलिसांनी संशयावरून विजयेंद्र आरोंदेकर याला अटक केली. त्यानंतर चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. त्या दोघांत प्रेमसंबंध होते. मात्र दोघांमध्ये बिनसल्याने विजयेंद्रने दीपाली हिचा खून केला होता.