युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

0
38

महागाई व बेरोजगारी या दोन मुद्द्यांवरून येथील आझाद मैदानावर शांततापूर्णरित्या धरणे आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मोर्चा नेण्याच्या तयारीत असलेल्या कॉंग्रेसच्या युवा नेत्यांना व कार्यकर्त्यांना पोलिसांची परवानगी नसल्याचे कारण पुढे करुन रोखले. त्यावेळी झालेल्या धुमश्‍चक्रीनंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यात कॉंग्रेसचे कित्येक युवा व अन्य कार्यकर्ते जखमी झाले. यावेळी काही कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली. नंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा तीव्र शद्बात निषेध करताना हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे सांगितले.

तसेच प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली. धरणे कार्यक्रमानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याची तयारी केली असता मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगून पोलिसांनी तो अडवला. त्यानंतर पोलीस व कार्यकर्ते यांच्यात धुमश्‍चक्री झाली.