यापुढे कोरोनाची नवी लाट अशक्य

0
8

>> कोविड तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. साळकर यांचा दावा

गोव्याबरोबरच देशातील विविध भागांत अजूनही कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सापडत असले, तरी आता कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता नसल्याचे सरकारने स्थापन केलेल्या कोविड तज्ज्ञ समितीतील सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना स्पष्ट केले.

कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण राज्यात सापडत असले, तरी आता राज्यात कोरोनाची लाट नसल्याचे व यापुढेही लाट येणार नसल्याचे डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले.

कोविड लसीकरणामुळे स्थिती नियंत्रणात आलेली असून, कोविड लाटांचा धोका टळला आहे. संसर्ग झालेले रुग्ण अजूनही सापडत असले तरी, कोविडमुळे होणारे मृत्यूंचे सत्र बंद झाले आहे. लसीकरणामुळे स्थिती बदलली असून, ज्या लोकांनी अजूनही बुस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी तो घ्यावा, असे आवाहन डॉ. साळकर यांनी केले.

दरम्यान, गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले नवे १०२ रुग्ण सापडले असून, राज्यातील सक्रिय कोविड रुग्णसंख्या ७९९ एवढी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.१३ टक्के एवढे असून, गेल्या २४ तासांत रोगमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १७४ एवढी आहे.