म्हादई नदी पथकातील अधिकार्‍यांची पुनर्रचना

0
110

म्हादई नदी पथकातील अधिकार्‍यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यात ज्यांच्याविषयी संशय घेता येईल अशा अधिकार्‍यांना स्थान देण्यात आले नसल्याचे काल जलसंसाधन खात्याचे मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी सांगितले. या संबंधी बोलताना रॉड्रिग्ज यांनी, म्हादईबाबत कोणतीही तडजोड वा हलगर्जीपणा करण्यात येणार नसल्याचे सांगितले.

रॉड्रीग्ज यांनी नुकतेच म्हादई पथकातील अधिकार्‍यांनी पनर्रचना करण्यात येणार असल्याचैे सांगितले होते. पुनर्रचना केलेल्या पथकात मूळ कर्नाटकातील असलेल्या एका अधिकार्‍याचा समावेश होता. तसेच जलस्त्रोत खात्यातील एका मूळ कर्नाटकी अधिकार्‍याने म्हादईसंबंधी महत्त्वाची भूमिका असलेले दस्तऐवज कर्नाटकला दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता.