म्हादईप्रश्‍नी गोव्याची केवळ बघ्याची भूमिका ः सुदिन

0
453

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने तसेच राज्यातील भाजप सरकारने म्हादई नदी कर्नाटकच्या घशात घातली आहे. कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी मलप्रभा नदीच्या पात्रात यापूर्वीच वळवले असून गोवा सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप काल मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे केला.

म्हादईप्रश्‍नी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोमंतकीयांचा पूर्ण विश्‍वासघात केला असल्याचा आरोपही ढवळीकर यांनी केला. आता कर्नाटकने यापूर्वीच म्हादईचे पाणी वळवले असल्यामुळे गोव्यात आल्यावर जावडेकर यांनी त्याप्रश्‍नी मौन बाळगले. यावरून त्यांनी म्हादईप्रश्‍नी गोव्याचा विश्‍वासघात केला आहे उघड होत असल्याचे ढवळीकर म्हणाले. म्हादई आता हातातून गेलेलीच असून आता सरकारने पावसाचे जे पाणी समुद्रात वाहून जाते ते अडवावे असे म्हटले आहे.